📢 महत्वाची घोषणा! अतिवृष्टी नुकसान भरपाई 2025 सुरू – तुमचं नाव आहे का?
🌧️ अतिवृष्टी नुकसान भरपाई 2025 – शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा!
नमस्कार, शेतकरी मित्रानो आज तुमच्यासाठी मोठी खुशखबर घेऊन आलो आहोत.त्यामुळे तुम्हाला सरकारकडून मिळालेली माहिती आम्ही तुमच्या पर्यंत पोहचावीत असतात.जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळत असते.तर हा सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित वाचा.
मित्रांनो, यावर्षीच्या अतिवृष्टी, पूर आणि सततच्या पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत, राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान जाहीर केले आहे.
🧾 योजनेचे तपशील
या अनुदानांतर्गत, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या प्रकारानुसार प्रतिहेक्टर आर्थिक मदत मिळणार आहे. खालील तक्त्यात याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे 👇
शेती प्रकार प्रतिहेक्टर मदत रक्कम (₹) जास्तीत जास्त मर्यादा
कोरडवाहू पिके ₹8,500 3 हेक्टर
बागायती पिके ₹17,000 3 हेक्टर
बहुवार्षिक पिके ₹22,500 3 हेक्टर
रब्बी हंगाम निविष्ठा अनुदान ₹10,000 3 हेक्टर
💡 उद्देश
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुढील आपल्या शेतातील पिकबियाने,खते,यासाठी काही मदत व्हावी म्हणून तात्काळ आर्थिक मदत देऊन त्यांना पुढील हंगामात उभे राहण्यास मदत करणे.
रक्कम कशी मिळेल?
मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर DBT च्या माध्यमातून जमा केली जाईल.
शेतकऱ्यांनी त्यांच्या 7/12 उताऱ्यांसह, पीक नुकसान पंचनामा आणि बँक खात्याची माहिती ग्रामसेवक किंवा तलाठी कार्यालयात द्यावी लागेल.
संबंधित जिल्हा प्रशासनाच्या तपासणीनंतर योग्य शेतकऱ्यांना मदत दिली जाईल.
📍 पात्रता निकष
✅ शेतकरी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा
✅ शेतीचे नुकसान पंचनाम्यात नमूद असावे
✅ लाभार्थी शेतकऱ्याचे बँक खाते DBT साठी नोंदणीकृत असावे
✅ जास्तीत जास्त 3 हेक्टर क्षेत्राला मदत मिळेल
📰 निष्कर्ष
राज्य सरकारने सुरू केलेली ही अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार आहे. या अनुदानामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी आवश्यक वस्तू खरेदी करण्यात मदत होईल आणि आर्थिक स्थिरता साधता येईल.